CBSE, स्टेट बोर्ड आणि सांस्कृतिक मूल्यांमध्ये सूर्यदत्त शाळा अव्वल : NABET मानांकनाने वाढला प्रतिष्ठेचा मान
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सूर्यदत्त समूहाच्या शाळांनी टाईम्स स्कूल सर्व्हे – वेस्ट झोन पुणे आवृत्तीत विविध श्रेणींमध्ये अव्वल क्रमांक पटकावत शैक्षणिक आणि सांस्कृतिक उत्कृष्टतेची मजबूत छाप सोडली आहे. CBSE, स्टेट बोर्ड आणि सांस्कृतिक मूल्यांमध्ये प्रथम क्रमांकाची नोंद करून शाळांनी पुन्हा एकदा आपल्या गुणात्मक कार्याची सिद्धता दिली.
सूर्यदत्त नॅशनल स्कूल, सूर्यदत्त पब्लिक स्कूल आणि सूर्यदत्त संस्थेच्या इतर शैक्षणिक उपक्रमांनी मिळून वेस्ट झोन पुण्याच्या प्रतिष्ठित ‘टाईम्स स्कूल सर्व्हे’मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. सूर्यदत्त नॅशनल स्कूलला CBSE बोर्ड विभागात प्रथम क्रमांक मिळाला. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता, सातत्यपूर्ण शैक्षणिक प्रगती आणि सर्वांगीण शिक्षण पद्धती यामुळे हा सन्मान प्राप्त झाला.
सूर्यदत्त पब्लिक स्कूलने स्टेट बोर्ड विभागात पहिला क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य आणि मूल्यांवर आधारित शिक्षण देण्याच्या शाळेच्या ध्येयधोरणाचे हे फलित मानले जात आहे.
सूर्यदत्त नॅशनल स्कूलला सांस्कृतिक मूल्यांमध्ये उत्कृष्टतेचा विशेष मान प्राप्त झाला, ज्यातून विद्यार्थ्यांच्या नैतिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासावर दिलेला भर अधोरेखित होतो.
याशिवाय, NABET मानांकनाने सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या गुणवत्ता शिक्षण, व्यवस्थापन कौशल्य आणि संरचित अभ्यासक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जीवनकौशल्य विकासात परिणामकारक योगदान देणाऱ्या स्नेहल नवलखा (AVP) यांच्या कार्याचेही विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या सहकार्याने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी शक्य झाली.
सूर्यदत्त शाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगतीसाठी प्रगत विचारसरणीची शिक्षणपद्धती राबवत असतात. या यशामुळे संस्थेची गुणवत्ता, मूल्याधारित शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीची बांधिलकी अधिक अधोरेखित झाली आहे.
हे यश म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. या गौरवाने पुढील शैक्षणिक आणि सांस्कृतिक शिखर गाठण्याची प्रेरणा मिळाली आहे.- प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन



















